Raigad Irshalwadi Landslide | ‘रात्रीचा अंधार, धुकं आणि पावसामुळे बचावकार्य कसं करावं हा प्रश्न समोर उभा होता, पण…’; महाजन यांची प्रतिक्रिया
त्यावेळी लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं. याचदरम्यान याची माहिती देखील मंत्री गिरीश महाजन यांना मिळताच त्यांनी देखील रायगडच्या या दुर्घटनाग्रस्त इर्शालगडाकडे धाव घेतली.
रायगड, 20 जुलै 2023 | रायगडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत खालापूरच्या इर्शालगडवाडी रात्रीचा अंधार, धुकं आणि पावसात रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी यांनी धाव घेतली. त्यावेळी लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं. याचदरम्यान याची माहिती देखील मंत्री गिरीश महाजन यांना मिळताच त्यांनी देखील रायगडच्या या दुर्घटनाग्रस्त इर्शालगडाकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी महाजन यांनी, इर्शालगडावर सहा किलोमीटर अंतरावर ही वाडी असून दोन किलोमीटरचा हा ट्रेक आहे. यावेळी तेथे जाताना मुंबईतील अग्निशमन दलाच्या एका जवानाला धाप लागून हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्या जवानाचा झाल्याची दुर्देवी घटना घडली. त्यानंतरही आम्ही वरती गेलो आणि बचावकार्य सुरू केलं. मात्र रात्रीचा अंधार, धुकं आणि पावसामुळे अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला मदतकार्य करण्यास अडथळे येत होते. मात्र, तरीही रेस्क्यू टीमने रात्रभर जागून मदतकार्य केले. यावेळी माहिती घेतली असता येथे २०० ते २७५ लोक राहत असल्याची माहिती मिळाली तर फक्त काही घरेच वाचली मात्र दरड ४० ते ५० घरांवर गेल्याने ती गाडली गेली आहेत.
Published on: Jul 20, 2023 10:24 AM
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
