gulabrao patil | ‘शिंदे गटात सहभागी होताना सर्वच देव आठवले होते’ गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
देवाच्या आशीर्वादाने आजपर्यंत यश मला मिळालं आहे. यापुढेही देव नेहमी असेच पाठिशी उभे राहतील अशी प्रार्थना बापाकडे केली आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
जळगाव : शिंदे गटात सहभागी होतानाचा जो निर्णय घेतला त्यावेळी गणपती बाप्पाचं नव्हे तर अक्षरशा सर्व देव आठवले होते. उद्धव ठाकरेंचे साथ सोडून शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळख असलेल्या गुलाबराव पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले. शिंदे गटात सहभागी होतानाचा जो निर्णय घेतला त्यावेळी गणपती बाप्पाचं नव्हे तर अक्षरशा सर्व देव आठवले होते, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. राजकारणासाठी कुठलेही क्षेत्र संकट हे येत असतात, त्यावेळी आपल्याला गणपती बाप्पाची आठवण येते. आम्ही ज्यावेळेस शिंदे गटात सहभागी झालो होतो त्यावेळी सर्वच देव आठवले होते. देवाच्या आशीर्वादाने आजपर्यंत यश मला मिळालं आहे. यापुढेही देव नेहमी असेच पाठिशी उभे राहतील अशी प्रार्थना बापाकडे केली आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
