‘तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून मी…’; आव्हाड अन् सुरेश धसांमध्ये कशावरून जुंपली?
काल जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर आज पुन्हा त्यांना घेरल्याचे पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेल्या एका ट्विटमध्ये, परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नका, असं सुरेश धस एका व्हिडीओमध्ये बोलताना दिसले होते
बीडचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण, परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकऱण आणि बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे एन्काऊंटरवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच जुंपली आहे. काल जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर आज पुन्हा त्यांना घेरल्याचे पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेल्या एका ट्विटमध्ये, परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नका, असं सुरेश धस एका व्हिडीओमध्ये बोलताना दिसले होते. त्यावरून आव्हाडांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मग याच न्यायाने वाल्मिक कराडलाही माफ करायचं का?’, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. तर यावर बोलताना सुरेश धस यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले. ‘माझं वक्तव्य मोडून-तोडून दाखवलं जातंय. माझं मीडिया ट्रायल चालवलं जातंय’, असं सुरेश धस यांनी म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केला. तर यावरही पलटवार करत जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधत तुम्हाला मीडियाचा एम माहित नव्हता तेव्हापासून मी मीडियात येतोय, असं ते म्हणाले.