मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलची व्यवस्था वाऱ्यावर? माणसांचं रुग्णालय की जनावरांचं?
tv9 Marathi Special Report | नांदेडच्या रूग्णालयाची दुरावस्था सगळ्यांसमोर आल्यानंत आता मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलची व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर राहुल नार्वेकर यांनी संताप व्यक्त केलाय. सत्ताधारी आमदार राहुल नार्वेकर यांच्या पाहणीवेळी धक्कादायक वास्तव समोर
मुंबई, २० ऑक्टोबर २०२३ | विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधारी आमदार राहुल नार्वेकर यांच्या पाहणीवेळी मुंबईतील सरकारी रूग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आलंय. ज्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर घेतलंय. नांदेडच्या रूग्णालयाची दुरावस्था सगळ्यांसमोर आल्यानंत आता मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलची व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर राहुल नार्वेकर यांनी संताप व्यक्त केलाय. खुद्द सत्ताधारी आमदारांच्या पाहणीवेळी धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. रूग्णायलातील भीषण आवस्था, तांत्रिक अडचणी, रूग्णालयाबाहेर खासगी चाचण्यासाठी फिरणारे एजंट असा अनेक गोष्टी समोर आल्यात. मतदारसंघातील तक्रारीनंतर राहुल नार्वेकर हे सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. यावेळी रूग्णालयात अस्वच्छता, डॉक्टर आणि स्टाफची पुरेशी व्यवस्था नव्हती यावर त्यांनी जाब विचारला. यानंतर विरोधकांनी राज्यातील आरोग्य खात्याच्या कारभारावरच टीका केली. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

