दोन रोहित अन् एकच मंच… दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखे़ड तालुक्यातील राशीन येथे शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकुल भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या उपस्थित हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखे़ड तालुक्यातील राशीन श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा असल्याने तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. रोहित शर्मा हा व्यासपीठावर आल्यावर सुरूवातीला व्यासपीठावरील ठेवलेल्या सर्व पूजनीय असलेल्या महान व्यक्तींचे फोटो लावले होते. त्याला नमस्कार करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी सांगितल्यावर क्रिकेटपटू रोहित शर्मा याने तत्काळ आपले पायातील बूट काढून सर्व महामानवांच्या फोटोला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने रोहित शर्मा यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. बघा या वेळी काय म्हणाले हिटमॅन रोहित शर्मा?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

