AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Live | झालं कसं की ते फक्त आमचीच होर्डिंग लागायची नाहीत - राज ठाकरे

Raj Thackeray Live | झालं कसं की ते फक्त आमचीच होर्डिंग लागायची नाहीत – राज ठाकरे

| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 3:33 PM
Share

राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावेळी मनसे कार्यकर्ते आणि नाशिक पोलिसांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जागोजागी होर्डिंग्स लावून जंगी स्वागत केलं.

राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावेळी मनसे कार्यकर्ते आणि नाशिक पोलिसांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जागोजागी होर्डिंग्स लावून जंगी स्वागत केलं. यावरुन नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय चांगलेच तापले. पांडेय यांनी याबाबत राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चाही केल्याची माहिती मिळेतय. दरम्यान, आज पत्रकारांनी याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच प्रश्न विचारला. त्यावेळी राज यांनीही खास उत्तर दिलं.

‘होर्डिंग लावणं अयोग्यच आहे. शहर विद्रुप दिसतं. मीच सांगितलं होतं की होर्डिंग लावू नका. पण आमचे लोक म्हणाले, आमचे सोडून बाकीच्यांचे लागतात. मग मी म्हटलं करा काय करायचं ते’, असं आपण सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले.

Follow Us