लोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये : संदीप देशपांडे

वरळी मतदारसंघात हनुमान गल्ली परिसरात जवळपास 20 हून अधिक मॅनहोल्स उघडे असल्याचं मनसेने समोर आणलंय. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी महापौरांवर हल्लाबोल केला.

वरळी मतदारसंघात हनुमान गल्ली परिसरात जवळपास 20 हून अधिक मॅनहोल्स उघडे असल्याचं मनसेने समोर आणलंय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा हा मतदारसंघ असूनही ही अवस्था इथे आहे तर मुंबई शहराचं काय असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केलाय. महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) फक्त दावा करतात, मात्र किती मॅनहोल्स सुरक्षित आहेत ते त्यांनी तपासावे. आमदारांनी इथून एक राऊंड मारावा. महापौर लोकांचे बाप काढतात त्यांनी जास्त शहाणपणा शिकवू नये, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. (MNS leader Sandeep Deshpande attacks on Mumbai Mayor Kishori Pednekar over open manholes in Worli )