Raj Thackeray : ‘जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?’, बघा काय केला हल्लाबोल?
राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. गद्दार घरात बसलाय, ज्याने पक्षाशी गद्दारी केली, असं राज ठाकरे यांनी म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय तर एका माणसाने पक्षाची वाट लावली, असं म्हणत राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंवर टीका केली
महाराष्ट्र नविर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज लालबाग मेघवाडी येथे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. गद्दार घरात बसलाय, ज्याने पक्षाशी गद्दारी केली, असं राज ठाकरे यांनी म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय तर एका माणसाने पक्षाची वाट लावली, असं राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, ‘या महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याबद्दल सांगितले आणि ते भोंगे खाली उतरवले आणि बंदही झालेत. भोंगे आम्ही भोंगे उतरवतो पण हनुमान चालीसा म्हणून नका… त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.’, असे राज ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटले, ‘मागे कधी एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थ आणि अनेक सभांमधून अनेकदा सांगितले होतं मशिदींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?’, असा सवाल करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला.
Published on: Nov 18, 2024 04:08 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
