AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुषमा अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड

सुषमा अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 15, 2024 | 11:32 AM
Share

श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ लावत जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पलटवार करत राज ठाकरेंच्या जुन्या व्हिडीओचा सपाटा लावल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे राज ठाकरेंच्या हात धुवून मागे लागलेत

एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ लावत जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पलटवार करत राज ठाकरेंच्या जुन्या व्हिडीओचा सपाटा लावला आहे. कळव्यातील श्रीकांत शिंदे यांच्या सभेत राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंचा एकच व्हिडीओ लावला मात्र सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंचे एका मागून एक व्हिडीओ लावून त्यांच्या भूमिकेची चिरफाड केली. खरंतर बऱ्याच कालावधीनंतर राज ठाकरे यांनी जाहीर सभेत व्हिडीओ लावला तो ही सुषमा अंधारेंचा… यालाच प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे हे राज ठाकरेंच्या हात धुवून मागे लागले आहेत. बाळासाहेबांवरचा निलेश राणेंचा व्हिडीओ लावून पहिला पलटवार, कडेवर माझीच पोरं खेळवायची म्हणणारा व्हिडीओ लावून दुसरा पलटवार, मोदींना राजकीय क्षितीजावरून नाहीसे करा, म्हणणारा व्हिडीओ लावून तिसरा पलटवार करत राज ठाकरेंवर केला हल्लाबोल… बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 15, 2024 11:32 AM
Follow Us