आणि 3 ते 4 मिनिटात अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, ऑफिसबाहेरचं CCTV फुटेज समोर
मॉरिस भाईने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या आणि यानंतर मॉरिसनेपण स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात आता वेगळं आलं आहे. घोसाळकर यांच्या ऑफिसबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे घोसाळकर यांच्या भागातील मॉरिस भाईने त्यांना ऑफिसमध्ये बोलवून फेसबुक लाईव्ह केलं आणि घोसाळकर संवाद साधत होते त्यांचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर मॉरिस भाईने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि यानंतर मॉरिसनेपण स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात आता वेगळं आलं आहे. घोसाळकर यांच्या ऑफिसबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तर या फुटेजमधीअभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मॉरिस याचा मित्र मेहुल याला संशयित म्हणून पाहिलं जातं होतं. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये ऑफिसमध्ये होते. त्यादरम्यान मेहुल हा आतमध्ये येऊन गेला होता. गोळीबार होण्याआधी तो तिथून बाहेर पडला आणि रिक्षाजवळ गेला. तिथून परत एकदा पान टपरीजवळ गेला आणि त्यानंतर रिक्षात बसून निघून गेला. सीसीटीव्ही फुटेज पाहून काही सवाल उपस्थित होत आहेत ते म्हणजे मेहुलसोबत रिक्षामध्ये असलेले दोघे कोण आहेत?
Published on: Feb 14, 2024 11:00 PM
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
