Samruddhi Mahamarg : समृद्धीवर कोणते अडथळे, अमोल कोल्हे यांनी केला जुना व्हिडीओ शेअर, म्हणाले
VIDEO | समृद्धी महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा होत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत असताना अभिनेता अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर अमोल कोल्हे यांनी त्यांचा जुना व्हिडिओ शेअर केला, म्हणाले...
मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. समृद्धी महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा होत असल्याची टीका आता विरोधकांकडून करण्यात येत असताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केला आहे. ते म्हणाले, ते म्हणाले, आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याची बातमी वाचली. सर्व मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! जेव्हा आम्ही ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा प्रयोग छत्रपती संभाजीनगर येथे करत होतो, तेव्हा समृद्धी महार्गावरून प्रवास करण्याचा योग आलेला, तेव्हा मी माझा अनुभव सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा विचार करून काही निरीक्षण मी मांडली होती. तो व्हिडीओ पुन्हा एकदा मुद्दामहून आपल्यासोबत शेअर करतोय, आवर्जून पहा!
Published on: Oct 15, 2023 03:40 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
