Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जेजे रुग्णालयात हलवलं, प्रकृती आणखी खालावली?
खासदार नवनीत राणा यांना भायखळा जेलमधून जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं.
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भायखळा जेलमधून जेजे रुग्णालयात हलवण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आणि आता जामिनासाठी राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी राणा दाम्पत्याचा अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण राणा यांच्या खारमधील घराची मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) तपासणी करणार आहे. तशी नोटीसच मुंबई महापालिकेकडून बजावण्यात आली आहे. घरात मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम, काही नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेनं तपासासाठी नोटीस पाठवली आहे.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
फडणवीस सरकार अॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?

