मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या सहसचिवांवरील ठपक्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस अहवालातील चुकीच्या उल्लेखावर आयोगाने खुलासा केला असला, तरी आमदार रोहित पवारांनी मार्किंग पॅटर्न लीक झाल्याच्या मूळ प्रश्नावर बोट ठेवले आहे. आयोगाने यावर उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपल्या सहसचिवांवर ठपका ठेवल्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. आयोगाच्या माहितीनुसार, नागपूर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी चौकशी अहवालात अनावधानाने सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग असा उल्लेख केला होता. प्रत्यक्षात तो उल्लेख जॉईंट कमिशनर आणि इतर एक्साइज विभाग असा असावा, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
या स्पष्टीकरणावर आमदार रोहित पवारांनी ट्विट करत आपला तीव्र आक्षेप नोंदवला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेतील मार्किंग पॅटर्न लीक प्रकरणात, आयोगाने दिलेला खुलासा हा अत्यंत हास्यास्पद असल्याचे पवारांनी म्हटले आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, मुळात प्रश्न सहसचिव कोणाचा आहे हा नसून, मार्किंग पॅटर्न लीक झाला की नाही हा आहे. पवारांनी आयोगाला विचारले की, मार्किंग पॅटर्न देण्याची जबाबदारी आयोगाचीच होती, याचा विसर त्यांना पडला आहे का? जर मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेण्यात आला, याचे उत्तर आता आयोगाने द्यावे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
Published on: Sep 10, 2026 08:32 AM
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...

