AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...

अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज…

| Updated on: Sep 10, 2026 | 8:13 AM
Share

पुण्यामध्ये MPSC चा अभ्यास करणाऱ्या प्रथमेश देशमुख (२८) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रथमेश मूळचा धाराशिव जिल्ह्यातील खासापुरी गावचा होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके उद्या प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेणार आहेत. या भेटीनंतर सीजेपी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. प्रथमेश देशमुख (वय २८) या MPSC अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. प्रथमेश हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील खासापुरी गावाचा रहिवासी होता. या घटनेमुळे MPSC विद्यार्थ्यांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, अभिजीत दिपके हे प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.  कालच त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून याबाबत मत व्यक्त केलं होतं त्यानंतर आता त्यांनी प्रथमेशच्या घरी भेट देण्यचा निर्णय घेतला आहे.  आज ही भेट नियोजित असून, या भेटीदरम्यान दिपके कुटुंबीयांशी संवाद साधून प्रथमेशने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमकी परिस्थिती आणि कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.

प्रथमेशच्या मृत्यूमुळे विद्यार्थी वर्गात आणि समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. प्रथमेशच्या मृत्यूच्या या संवेदनशील प्रकरणात, अभिजीत दिपके यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीनंतर सीजेपी (CJP) या संस्थेकडून किंवा संबंधित घटकांकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या संघर्षात या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे भविष्यातील आंदोलने किंवा मागण्या यांना नवी दिशा मिळू शकते.

Published on: Sep 10, 2026 08:13 AM

Follow Us