MSRTC : ‘लालपरी’च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता बसची जास्त वाट बघावी लागणार नाही, कारण…
गेल्या काही दिवसापासून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बसचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता त्यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आली आहे. आता याबाबत एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका जाहीर केली आहे.
रस्ता तेथे एसटी आणि एसटी बसचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास एसटीच्या या ब्रीद वाक्याप्रमाणे आजही प्रवासी एसटी बसने प्रवास करणं पसंत करतात. अशातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अर्थात लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुमची लालपरी कुठपर्यंत पोहोचली हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे. एसटी बसचे लाईव्ह लोकेशन समजण्यासाठी एसटीच्या अॅपची सुरूवात होणार आहे. एसटी बसचे लाईव्ह लोकेशन जाणून घेता येणारं मोबाईल अॅप्लिकेशन येत्या १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासंदर्भातील माहिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तर लालपरीच्या प्रवाशांना आपल्या तिकिटावर असलेल्या नंबरच्या माध्यमातून बसची अचूक वेळ जाणून घेता येणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना ज्या बसने जायचं त्याची वाट पाहावी लागणार नाही आणि खोळंबा देखील होणार नाही.
Published on: Jun 24, 2025 12:56 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
