MSRTC : लालपरीनं प्रवास करताय? आनंदाची बातमी, एसटी बस तिकीटात मिळणार 15 टक्के सूट; पण कशी?
एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारक प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही एसटीने आरक्षण करून प्रवास करत असाल तर आता तुमचे पैसे बचत होणार आहे. एसटीच्या तिकिटाचं आरक्षण करणाऱ्यांना आजपासून १५ टक्के सूट मिळणार आहे. दिवाळी आणि उन्हाळी हा सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अरक्षण करताना १५ टक्के सूट मिळणार आहे. तर लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी अगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना ही सूट मिळणार आहे.
या योजनेची सुरुवात आजपासून अर्थात १ जुलैपासून होत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले आहे. १ जून रोजी एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनी प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. मात्र ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू असणार आहे.

ना हनी, ना ट्रॅप..; हनीट्रॅपवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?

बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप

मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण
