Mumbai | मुंबईत 50 हजार नागरिक दरडीच्या छायेत, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती
डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील जवळपास 50 हजार नागरिक हे दरडीच्या छायेत वास्तव्य करत आहेत. मुंबई शहरासह उपनगरातील 24 वॉर्डपैकी 21 वॉर्डमध्ये 291 ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे.
अवघ्या दोन दिवसांपूर्वी चेंबूर-वाशीनाका येथे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांच्या घरावर दरड कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील जवळपास 50 हजार नागरिक हे दरडीच्या छायेत वास्तव्य करत आहेत. मुंबई शहरासह उपनगरातील 24 वॉर्डपैकी 21 वॉर्डमध्ये 291 ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब जीवमुठीत घेऊन डोंगराळ भागात राहत आहेत. दरम्यान मुंबईत वाढत्या दरडी कोसळण्याच्या घटनांवरुन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईतील धोकादायक ठिकाणी असलेल्या वस्त्यांचा आढावा घ्या, असे निर्देश महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

