मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त…
मुंबईत बॅचलर्सना घर भाड्याने देण्यास नकार दिला जात असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मराठी अभिनेत्री सारिका साळुंखे हिने अंधेरी लोखंडवाला परिसरातील घरांच्या भाड्याबाबत आणि बॅचलर्सना येणाऱ्या अडचणींबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे.
मुंबईत बॅचलर्सना घर भाड्याने देण्यास नकार दिला जात असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मराठी अभिनेत्री सारिका साळुंखे हिने अंधेरी लोखंडवाला परिसरातील घरांच्या भाड्याबाबत आणि बॅचलर्सना येणाऱ्या अडचणींबाबत सोशल मीडिया पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे.
सारिका साळुंखे हिने पोस्टमध्ये, “आम्हाला ही फॅमिली सोबत राहायला आवडेल, मात्र, आम्ही मराठी कलाकार बॅचरल म्हणून आम्हाला घर नाकारले जाते,” असे म्हटले आहे. तसेच, “अंधेरी लोखंडवाला येथे घराचे भाडे पन्नास हजार आणि दलाली देखील ५० हजार आहे. का कुठला कायदा” असा सवाल तिने केला.
सारिकाने पुढे आपल्या कुटुंबाचा संदर्भ देत, “माझे आई-वडील सातारा येथे राहातात.आम्ही आनंदासाठी एकटे राहत नाही. त्यांना घेऊन आम्ही येथे राहु शकत नाही.ते गावी शेती करतात. आमची शेती मग तुम्ही जाऊन करणार का ? मराठी लोकांनी नालासोपारा आणि मीरारोडमध्ये राहायचे का” असा सवाल केला.
बॅचलर्सना घर न देण्याचा नियम बदलावा, तसेच घराच्या भाड्याएवढी दलाली घेण्याचा नियमही बदलावा, अशी मागणी सारिकाने केली आहे.
Published on: Aug 11, 2026 01:02 PM
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...

