Mumbai Crime: तरूणीवर चाकू हल्ला करत तरूणाचे स्वतःवरही वार, काळाचौकीत जीवघेणा प्रकार, नेमकं घडलं काय?
मुंबईतील काळाचौकी परिसरात एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यातील तरुणाचा मात्र उपचारादरम्यान केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून, घटनेमागील कारण आणि दोघांमधील संबंधांची माहिती घेतली जात आहे.
मुंबईतील काळाचौकी परिसरात एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ही घटना समोर आली. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणीला सुरुवातीला आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी तिला जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
तरुणी सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दुसरीकडे, या हल्ल्यातील तरुणाला केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्ला करणारा तरुण आणि जखमी तरुणी एकाच परिसरात राहत होते आणि ते एकमेकांना ओळखत होते. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मृत तरुणाबाबत एडीआर (Accidental Death Report) दाखल करण्यात येणार असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरु आहे.
Published on: Oct 24, 2025 10:46 PM
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
