आज मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक!
मुंबईत रविवारी मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावरील सेवा विस्कळीत होईल. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळापत्रक तपासून घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मुंबईत रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉक डहाणू येथे असल्याने मुंबईतील पश्चिम रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन दिशेच्या धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11 वाजून 5 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 5 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासून घेण्याचे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?

