Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो... उद्या लोकलने प्रवास करणार आहात? मग हा व्हिडीओ बघा, कुठे असणार मेगाब्लॉक?

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो… उद्या लोकलने प्रवास करणार आहात? मग हा व्हिडीओ बघा, कुठे असणार मेगाब्लॉक?

| Updated on: Nov 30, 2024 | 12:11 PM

ऊपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबईतील ऊपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील, तर विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान जलद मार्गावर धावणाऱ्या गाड्या धीम्या मार्गावर धावतील. यामुळे विक्रोळी, कंजूरमार्ग, नाहूर, मुलुंड, भांडुप, ठाणे, पारसिक येथील स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. तर हार्बर रेल्वेवर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॅक असेल परिणामी ब्लॉक कालावधीत पनवेल/वाशीहून सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या बेलापूर मार्गावरून बदलून धावतील. तसेच या मार्गावरील काही गाड्यांची सेवा रद्द करण्यात येईल. तर पश्चिम रेल्वेत रात्री १२.१५ ते पहाटे सव्वा ४ पर्यंत मेगा ब्लाॅक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत ब्लॉक असल्याने परिणामी ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि माहिम स्थानकांदरम्यान सर्व डाउन धीम्या मार्गावरील गाड्या डाउन जलद मार्गावर चालवल्या जातील.

Published on: Nov 30, 2024 12:11 PM