Mumbai Nagpur Expressway : मुंबई-नागपूर महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे शिवना नदीला पूर, वाहतूक ठप्प
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे मुंबई-नागपूर महामार्ग बंद झाला आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे, ज्यामुळे महामार्गावरील संपर्क तुटला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वाहणारी सर्वात मोठी नदी असलेल्या शिवना नदीला प्रचंड मोठा पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या पुरामुळे मुंबई-नागपूर महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. महामार्गावरील पुलावरून नदीचे पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे नागपूर-मुंबई महामार्गावरील संपर्क तुटला आहे. नदीतून मोठ्या प्रमाणात लाकूड आणि इतर साहित्य वाहत असल्याचे दिसून येत आहे. लासूर गावाकडची आणि पलीकडची वाहने सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आली आहेत. पावसाच्या सततच्या धोक्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Sep 28, 2025 04:11 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

