AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव 80 % भरले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने पाणीसाठा

Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव 80 % भरले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने पाणीसाठा

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 9:02 AM
Share

Pune Rain | सध्या असलेला जलसाठा पुढील दहा महिने पुरेल इतका असून तलाव कक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी अधूनमधून पडत आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव 80 % भरले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने पाणीसाठा. तुळशी, विहार, मोडकसागर आणि तानसा हे तलाव भरले असून उर्वरित अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा ही मोठी धरणे अजूनही भरायची आहेत. सध्या असलेला जलसाठा पुढील दहा महिने पुरेल इतका असून तलाव कक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी अधूनमधून पडत आहेत. त्यामुळे जलसाठ्याचे समाधानकारक चित्र असल्याचे जलअभियंता खात्याने सांगितले. मुंबईत सद्या पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे वातावरणातील उकाडा वाढला आहेत. पावसाळ्याचा अजून एक महिना शिल्लक आहे. उर्वरित धरणे या काळात भरून वाहू लागतील, असा विश्वास पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे.