AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच... व्हिडीओ तुफान व्हयरल

Video | मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच… व्हिडीओ तुफान व्हयरल

| Updated on: Jul 04, 2026 | 2:31 PM
Share

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच भांडुपमधील सोनापूर परिसरात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच भांडुपमधील सोनापूर परिसरात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धो धो बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्याखालील मातीच वाहून गेल्याने अचानक रस्त्याचा काही भाग खचला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

स्थानिक नागरिकांनी जवळच सुरू असलेल्या खोदकामामुळे रस्ता कमकुवत झाल्याचा दावा केला आहे. परिसरात काही दिवसांपासून खोदकाम सुरू असल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्याखाली गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच रस्ता खचल्याचा आरोप त्यांनी संबंधित काम करणाऱ्या यंत्रणांवर केला आहे.

घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Jul 04, 2026 02:31 PM

Follow Us
सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल.

सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल

आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!.

आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?.

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान.

वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान

झुकणार नाही, वाकणार नाही आम्हाला कापलं तरी…, आदित्य ठाकरेंचा मुंबईतून भाजपवर हल्लाबोल, दिपकेंच्या आंदोलनावरून वातावरण तापलं.

झुकणार नाही, वाकणार नाही आम्हाला कापलं तरी…, आदित्य ठाकरेंचा मुंबईतून भाजपवर हल्लाबोल, दिपकेंच्या आंदोलनावरून वातावरण तापलं

IND vs ENG: तिसऱ्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा 20 चेंडूंचा कारनामा, फलंदाजांना आणलं अडचणीत.

IND vs ENG: तिसऱ्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा 20 चेंडूंचा कारनामा, फलंदाजांना आणलं अडचणीत