Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात घडलेल्या मॅनहोल दुर्घटनेने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साकीनाका येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या पावसाळी तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सुमारे २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडल्याने अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर विरोधकांनी महापालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी या प्रकरणी थेट मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही प्रतिक्रिया देत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, मुंबईतील मॅनहोल्सच्या सुरक्षेसाठी महापालिकेकडून नियमावलीनुसार काम केले जाते. शहरात 1 लाखांहून अधिक मॅनहोल्स असून, त्यापैकी सुमारे 96 हजार मॅनहोल्सवर संरक्षणात्मक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. उर्वरित 4 हजार मॅनहोल्सवरील जाळ्या दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी तात्पुरत्या काढण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

अश्विनी भिडे यांनी पुढे स्पष्ट केले की, एल वॉर्डमधील 75 मॅनहोल्सपैकी 4 मॅनहोल्सवरील जाळ्या कामासाठी काढण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका मॅनहोलमध्ये अस्लम शेख पडल्याने ही दुर्घटना घडली. मॅनहोलवरील जाळी काढल्यानंतर त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारणे, सूचना फलक लावणे आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक असते. संबंधित ठिकाणी दोन कर्मचारी उपस्थित होते, मात्र इतर आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये त्रुटी राहिल्याचे त्यांनी मान्य केले.

या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या पावसाळी तयारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us