Mumbai Threat Call | मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार, ‘त्या’ महिलेने पोलिसांना केले ३८ वेळा कॉल
VIDEO | मुंबईत कुलाबा रोड परिसरात बॉम्ब असल्याचा फोन, गेल्या काही दिवसात मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला x३८ वेळा कुणी केला मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन? तपासातून काय आलं समोर?
मुंबई, ५ सप्टेंबर २०२३ | मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा फोन आला आहे. कुलाबा रोड परिसरात बॉम्ब असल्याचा मुंबई पोलिस मुख्य नियंत्रण कक्षाला फोन आला आहे. या धमकीच्या फोननंतर पुन्हा एकदा मुंबईत खळबळ उडाली आहे. तर कामाठीपुरात बॉम्बस्फोट होणार असल्याचाही मुंबई पोलिसांना फोन आला असून हा फोन एका महिलेचा असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसात महिलेने ३८ वेळा फोन केले असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या धमकीच्या फोन नंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासातून कोणतीही संशयास्पद हालचाल या ठिकाणी आढळली नसल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वीही मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचे फोन आले होते. अतिरेखी हल्ल्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली होती. तर या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क झाले होते.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त

