AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरधाव ट्रकची धडक अन् कारचा चक्काचूर, पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचं धुळ्यात अपघाती निधन

भरधाव ट्रकची धडक अन् कारचा चक्काचूर, पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचं धुळ्यात अपघाती निधन

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Jul 30, 2024 | 11:58 AM
Share

धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आणि मुंबईत कार्यरत असलेले युवा पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी आहे. ट्रकने कारला दिलेली धडक इतकी जबर होती की, पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धुळ्यात अनेक वाहनांना धडक देत काल (29 जुलै) ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने दोन तरूणांसह अनेक वाहनांना धडक दिली आहे. यामध्ये धडक दिलेल्या वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आणि मुंबईत कार्यरत असलेले युवा पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी आहे. ट्रकने कारला दिलेली धडक इतकी जबर होती की, पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार हर्षल भदाणे पाटील हे त्यांच्या गावी गेले होते. हर्षल पाटील हे गावावरुन परतत असताना धुळे जिल्ह्यातील गरताड गावाजवळ त्यांनी त्यांची कार उभी केली. त्यावेळी धुळे-औरंगाबाद महामार्गावर समोर आलेल्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यावेळी हर्षल भदाणे पाटील यांनी स्वतःला वाचवण्यासाठी कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी ते ट्रकच्या चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हर्षल भदाणे पाटील यांनी पत्रकारिता क्षेत्रात सात वर्षांहून अधिक काळ काम केलंय. हर्षल भदाणे यांच्या पश्चात त्यांची आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे. हर्षल भदाणे हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती, त्यांच्या जाण्याने भदाणे कुटुंबावर शोकळला पसरली आहे.

Published on: Jul 30, 2024 11:58 AM
Follow Us