AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचे धुळ्यात अपघाती निधन, भरधाव ट्रकने दिली कारला धडक

या घटनेनंतर ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी आणि ट्रक चालकाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांसहित सर्व मित्र परिवाराने केली आहे.

पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचे धुळ्यात अपघाती निधन, भरधाव ट्रकने दिली कारला धडक
| Updated on: Jul 30, 2024 | 10:15 AM
Share

Harshal Bhadane Patil Accident : धुळे शहरात एक भीषण अपघात घडला आहे. एका ट्रक चालकाने चार चाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आणि मुंबईत कार्यरत असलेले तरुण पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार हर्षल भदाणे पाटील हे त्यांच्या गावी गेले होते. हर्षल पाटील हे गावावरुन परतत असताना धुळे जिल्ह्यातील गरताड गावाजवळ त्यांनी त्यांची कार उभी केली. त्यावेळी धुळे-औरंगाबाद महामार्गावर समोर आलेल्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यावेळी हर्षल भदाणे पाटील यांनी स्वतःला वाचवण्यासाठी कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी ते ट्रकच्या चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. काल (29 जुलै) हा भीषण अपघात झाला.

दोन जण गंभीर जखमी

या कारमध्ये हर्षल भदाणे यांच्यासह आणखी दोन जण बसले होते. हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पण काही नागरिकांनी ट्रकचालकाचा पाठलाग करत त्याला बेदम चोप दिला.

ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालक आणि त्याच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. या घटनेनंतर ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी आणि ट्रक चालकाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांसहित सर्व मित्र परिवाराने केली आहे.

हर्षल भदाणे पाटील यांनी पत्रकारिता क्षेत्रात सात वर्षांहून अधिक काळ काम केलं. मनमिळाऊ स्वभावामुळे मुंबईतील पत्रकारांच्या वर्तुळात त्यांची चांगली ओळख होती. वृत्त निवेदक आणि पत्रकार अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. हर्षल भदाणे यांच्या पश्चात त्यांची आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे. हर्षल भदाणे हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होते. हर्षल भदाणे यांच्या जाण्याने भदाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...