AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मविआच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी चर्चेत, व्हायरल यादीत कुणाची नावं?

मविआच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी चर्चेत, व्हायरल यादीत कुणाची नावं?

| Updated on: May 24, 2023 | 6:58 AM
Share

VIDEO | लोकसभा निवडणुकीच्या मविआतील जागा वाटपाची संभाव्य उमेदवारांची यादी होतेय व्हायरल, यादीत काँग्रेसला सर्वाधिक जागा, तर ठाकरे गटाला किती?

मुंबई : राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यामुळे मविआच्या तीनही घटक पक्षांचं 16-16-16 जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली होती. पण मविआ नेत्यांकडून तसा काहीच फॉर्म्युला ठरला नसल्याचे मविआ नेत्यांनी सांगितलंय. तरीही लोकसभेच्या जागा वाटपाची एक यादीच आता समोर आली आहे. मविआच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची व्हायरल यादी चर्चेत आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण 48 जांगापैकी काँग्रेसला सर्वाधिक 16, राष्ट्रवादी काँग्रेसला 15, ठाकरे गटाला 13 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला एक आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना 2 जागा देण्यात आल्याचा दावा या यादीत करण्यात आला आहे.

जागा वाटपाच्या व्हायरल यादीत नेमकी कुणाला संधी, पाहा

नंदुरबार- के. सी. पाडवी (काँग्रेस)
धुळे- कुणाल पाटील (काँग्रेस)
जळगाव- गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
रावेर- एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर (शिवसेना-ठाकरे गट)
अकोला- सुनील फाटकर (वंचित बहुजन आघाडी)
अमरावती- दिनेश बूब (शिवसेना-ठाकरे गट)
वर्धा- रणजीत कांबळे (काँग्रेस)
गडचिरोली- धर्मराव बाबा आत्राम (राष्ट्रवादी)
रामटेक- नितीन राऊत (काँग्रेस)
नागपूर- नाना पटोले (काँग्रेस)
गोंदिया- प्रफुल पटेल (राष्ट्रवादी)
यवतमाळ- संजय देशमुख (शिवसेना-ठाकरे गट)
हिंगोली- प्रज्ञा सातव (काँग्रेस)
परभणी- संजय जाधव (शिवसेना- ठाकरे गट)
संभाजीनगर- अंबादास दानवे (शिवसेना-ठाकरे गट)
धाराशिव- ओमराजे निंबाळकर (शिवसेना-ठाकरे गट)
जालना- कल्याण काळे (काँग्रेस)
नांदेड- अशोक चव्हाण (काँग्रेस)
लातूर- मच्छिंद्र कामत (काँग्रेस)
सोलापूर- प्रणिती शिंदे (काँग्रेस)
बीड- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
कोल्हापूर- संजय पवार ( शिवसेना-ठाकरे गट)
दिंडोरी- नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी)
नाशिक- छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
पालघर- बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी)
भिवंडी- सुरेश टावरे (काँग्रेस)
कल्याण- आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
ठाणे- राजन विचारे (राष्ट्रवादी)
मुंबई उत्तर- संजय निरुपम (काँग्रेस)
मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर (शिवसेना-ठाकरे गट)
मुंबई उत्तर पूर्व- संजय दिना पाटील (शिवसेना-ठाकरे गट)
मुंबई उत्तर मध्य- प्रिया दत्त (काँग्रेस)
मुंबई दक्षिण मध्य- प्रकाश आंबेडकर ( वंचित बहुजन आघाडी)
मुंबई दक्षिण- अरविंद सावंत ( शिवसेना-ठाकरे गट)
रायगड- सुनील तटकरे ( राष्ट्रवादी)
मावळ- पार्थ पवार ( राष्ट्रवादी)
पुणे- रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
बारामती- सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर- अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगर- निलेश लंके (राष्ट्रवादी)
शिर्डी- बबनराव घोलप (शिवसेना-ठाकरे गट)
माढा- संजय शिंदे (राष्ट्रवादी)
सांगली- विश्वजीत कदम ( काँग्रेस)
सातारा- रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)
रत्नागिरी- विनायक राऊत (शिवसेना-ठाकरे गट)
हातकणंगले- राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
चंद्रपूर- बाळू धानोरकर (काँग्रेस)

Published on: May 24, 2023 06:57 AM