Maharashtra Assembly election 2024 : ठाकरे गट ‘इतक्या’ जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
२०१९ मध्ये ठाकरे गटाचे १४ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ८ आमदार सध्या ठाकरे गटासोबत आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला मुंबईत विधानसभेच्या जास्त जागा मिळाव्यात, ठाकरे गटाच्या बैठकीत नेत्यांचा असा सूर पाहायला मिळत आहे. ठाकरे गट मुंबईतील ३६ पैकी २५ जागांसाठी आग्रही असून ठाकरे गट मुंबईतील किमान २५ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील बहुतांश मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासही ठाकरे गट हा आग्रही आहे. दरम्यान, २०१९ मध्ये ठाकरे गटाचे १४ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ८ आमदार सध्या ठाकरे गटासोबत आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असणार आहे. २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत सरकार बनवण्यासाठी १४५ आमदार निवडून येणं आवश्यक आहे. त्यामुळे नेमकं कोण पुढे असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. बघा शिवसेना ठाकरे गट मुंबईतील कोणत्या जागांवर दावा करणार?
Published on: Jul 18, 2024 03:56 PM
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
