VIDEO: Nagar Panchayat Election | रोहित पाटलांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

राष्ट्रावादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी कवठेमहाकांळ नगरपंचायीतवर विजयी झेंडा फडकवला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आज पहायला मिळाला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 19, 2022 | 3:20 PM

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील (RR Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील(Rohit Patil) यांनी कवळेमहाकांळ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रचारादरम्यान विरोधकांना उत्तर देताना केलेलं विधान तंतोतंत खरं ठरलंय. विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता. दरम्यान, या विरोधकांच्या वक्तव्यांना उत्तर देताना विरोधकांना निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असं विधान केलं होतं. निवडणूक निकालानंतर अगदी तसंच झालंय. रोहित पाटील यांनी कवठेमहाकांळ नगरपंचायीतवर विजयी झेंडा फडकवला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आज पहायला मिळाला.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें