Nagpur Crime News : नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Nagpur Violence Updates : नागपूर हिंसाचार घटनेतील चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
नागपूर येथे सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 4 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज या आरोपींना नागपूर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आत्तापर्यंत एकूण 8 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. घटनेचा मास्टरमाइंड फहीम खान याला देखील या आधीच कोर्टात हजर केलेलं आहे. वैद्यकीय कारणामुळे त्याला देखील न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. आज इतर चार आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. त्यांना देखील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
Published on: Mar 21, 2025 06:31 PM
Latest Videos
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

