AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान

Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर… संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान

| Updated on: Sep 21, 2026 | 10:47 AM
Share

नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी भीषण दुष्काळ पडला असून, सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील शेतकरी आत्माराम टेकाळे यांनी प्रशासनाला आव्हान दिले आहे. "माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, मी तुम्हाला एक क्विंटल काजू-बदाम देतो," असे म्हणत त्यांनी सोयाबीनची दयनीय अवस्था मांडली.

नांदेड जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे दौरे आणि त्यांच्या बैठकांमध्ये काजू-बदाम याचा उल्लेख चर्चेचा विषय ठरला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर, अर्धापूर तालुक्यातील दाभड गावातील शेतकरी आत्माराम टेकाळे यांनी प्रशासनाला एक थेट आव्हान दिले आहे. “माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, मी तुम्हाला एक क्विंटलभर काजू, बदाम आणि पिस्ता देतो,” असे त्यांनी म्हटले आहे. टेकाळे यांच्या दीड एकर शेतीत सोयाबीनची रोपे वाढली, त्यांची उंचीही चांगली झाली. मात्र, पावसाच्या कमतरतेमुळे सोयाबीनला शेंगाच भरल्या नाहीत. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

आत्माराम टेकाळे यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, “साहेब, तुम्ही माझ्या शेतात येऊन बघा. कोणताही जाळ उपटा किंवा कोणता सोडून बघा. एक दाणाही सापडणार नाही. तुम्ही फक्त एक किलो काढा, मी तुम्हाला एक पोतंभर काजू, बदाम, पिस्ता देतो.” यातून शेतकऱ्याचा संताप आणि पिकांच्या नुकसानीमुळे आलेली निराशा स्पष्टपणे दिसून येते. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या गंभीर स्थितीकडे लक्ष देण्याची गरज या घटनेतून अधोरेखित होते.

Published on: Sep 21, 2026 10:47 AM

Follow Us