Video: वादळी वाऱ्याचं थैमान, पत्रा उडाला, तरुण बालंबाल बचावला, नांदेडमधील वादळानं थरकाप
Nanded Heavy Winds : आज उद्या मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असानी वादळामुळे वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळलंय.
नांदेड : नांदेडच्या (Nanded News) नायगावमध्ये वादळी वाऱ्यानं (Nanded Heavy Storms) थैमान घातलंय. यावेळी वादळी वाऱ्यामुळे एक पत्रा उखडला गेला. हा पत्रा एका तरुणाच्या अंगावर पडणार होता. पण हा तरुण थोडक्यात बचावलाय. अनेक घरांचे पत्र या वादळात उडाले आहेत. त्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय. दोन तरुण बाईकवर बसत होते. इतक्या वाऱ्याच्या वेगानं एक पत्रा हवेत उडत त्यांच्या दिशेनं आला. मात्र वेळीच जागेवरुन हटल्यानं मोठा अनर्थ टळलाय. या वादळीमुळे शेतातील पिकांचं आणि फळांचही नुकसान झालंय. काहीजण वादळी वाऱ्यानं किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, आज उद्या मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असानी वादळामुळे वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळलंय. तर नांदेडमधील नायगावमध्ये आंब्यांचं वादळी वाऱ्यानं नुकसान झालंय.

छोट्या टॉप आणि जीन्समध्ये आलिया भट्ट, मोकळे केस, काळ्या गॉगलने वाढवलं सौंदर्य

भोजपुरी हॉटनेस क्वीनचा Sunday लूक पाहिला का?

Malaika Arora हिच्या ग्लॅमरस अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना

virat kohli | विराट कोहली याचा धावण्याचा वेग उसेन बोल्टसारखा, किती वेगाने धावतो विराट

राघव यांच्यापेक्षा परिणीती हिची कमाई अधिक; किती आहे फरक?
