नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण अजगरासारखे… भाजप खासदार हे काय बोलून गेले?
जय श्रीरामाच्या नाऱ्यावरून घडलेल्या प्रकरानंतर आता भाजप खासदाराने नव्याने भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना टोला लगावलाय. काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्याच्या २४ तासातच राज्यसभेचे खासदार बनले. त्यामुळे पक्षातील मुळ नेत्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : अशोक चव्हाण यांना भाजपचे खासदार अजित गोपछडे यांना अजगराची उपमा दिल्याने एकच चर्चा होताना दिसतेय. यावेळी व्यासपीठावर प्रतापराव चिखलीकर देखील होते. त्यामुळे अजित गोपछडे यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता…यावरही चर्चांना उधाण आलंय. जय श्रीरामाच्या नाऱ्यावरून घडलेल्या प्रकरानंतर आता भाजप खासदाराने नव्याने भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना टोला लगावलाय. काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्याच्या २४ तासातच राज्यसभेचे खासदार बनले. त्यामुळे पक्षातील मुळ नेत्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. अशोक चव्हाण यांनी अजगराप्रमाणे मोठं व्हावं अशा शुभेच्छा देताना तुम्हाला लवकरात लवकर भाजपा कळणार नाही? असा टोलाही अजित गोपछडे यांनी अशोक चव्हाण यांना लगावलाय. खासदार अजित गोपछडे म्हणले की, अशोक चव्हाण साहेब आता तुम्ही आमच्यात आलात, तुम्हाला हळूहळू सर्व सिस्टीम समजायला उशीर लागेल. मात्र मला असं वाटतंय की तुम्ही भाजपमध्ये जावून आजगरा एवढे मोठे होता की काय? अशी चिंता खासदार अजित गोपछडे यांनी व्यक्त केली आहे. तर भारतीय जनता पार्टी ही भल्या भल्यांना समजत नाही, असेही त्यांनी खोचकपणे म्हटले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

