Republic Day Flag Hoisting | शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा
भारताचा 77व्या प्रजासत्ताक दिन आणि त्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यस्तरीय झेंडावंदन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानवंदना देण्यात आली.
भारताचा 77व्या प्रजासत्ताक दिन आणि त्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यस्तरीय झेंडावंदन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानवंदना देण्यात आली. त्याचबरोबर फडणवीस यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी देशाची एकता, संविधानाचे महत्त्व आणि राष्ट्र उभारणीत नागरिकांच्या योगदानावर भर दिला. तसेच सरकार करत असलेल्या कल्याणकारी योजनांची माहितीही दिली. या कार्यक्रमाला विविध मान्यवर, अधिकारी, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा

