Narayan Rane | मुख्यमंत्री कुटुंबाला सांभाळू शकले नाहीत, महाराष्ट्राला काय सांभाळणार? – नारायण राणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच मुद्द्यावरुन भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री स्वत:च्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही, ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? अशा बोचऱ्या शब्दात राणेंनी टीका केली. राज्याची कोरोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार कमी पडलं, असाही टोला राणे यांनी लगावला.
Latest Videos
