बाबासाहेबांचे आचार, विचार घेऊन मला देशात काम करायचंय : नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. नारायण राणे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. बाबासाहेबांनी देशाला जे काय दिलंय त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही,असं नारायण राणे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. नारायण राणे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. बाबासाहेबांनी देशाला जे काय दिलंय त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. अभूतपूर्व आहे त्यांनी देशाला घटना दिली. घटनेप्रमाणं देश चालतो, आम्ही रोज घटनेप्रमाणं काम करतो. गरीबांनी शिक्षण घ्यावं, शिस्त लावली. बाबासाहेब तुमचे आशीर्वाद माझ्यावर राहू देत, अशा शब्दात नारायण राणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुरु झाली. नारायण राणे यांनी चैत्यभूमीवर येण्यापूर्वी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकेर यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?

