सेनेचा आशीर्वाद नको, आम्हाला महागात पडेल : नारायण राणे
मी पहिला पूरग्रस्त कोकणचा दौरा केला. त्याचा अहवाल घेऊन केंद्रात गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राला 700 कोटी दिले. राज्य सरकारनं मदत लवकर मदत करावी, अन्यथा मी परत पंतप्रधान सांगेन की तुम्ही दिलेली मदत अजून लोकांना मिळालेली नाही, असा इशारा नारायण राणेंनी दिला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण माझं घर आहे घरी आल्यावर आनंद होतोच, असं म्हटलंय. आज कोकणात येताना प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे देखील सोबत आहेत. मी पहिला पूरग्रस्त कोकणचा दौरा केला. त्याचा अहवाल घेऊन केंद्रात गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राला 700 कोटी दिले. राज्य सरकारनं मदत लवकर मदत करावी, अन्यथा मी परत पंतप्रधान सांगेन की तुम्ही दिलेली मदत अजून लोकांना मिळालेली नाही, असा इशारा नारायण राणेंनी दिला. महाविकास आघाडी सरकार कोणत्या बाजूनं आहे. लोकांना न्याय द्यावा त्यासाठी ही यात्रा आहे. मुंबई महापालिका आम्ही जिंकावी जगातील पर्यटन शहर स्वच्छ सुंदर शहर कोरोना मुक्त शहर बनावं म्हणून प्रयत्न करत आहोत. शिवसेने कडून आम्हाला आशीर्वाद नको महागात पडेल. त्यांचा रोखीचा आशीर्वाद असतो. आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत कायम घरीच बसा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

