Narayan Rane : ‘लायकी पेक्षा जास्त बोलताय..’, राणेंची प्रकाश महाजनांवर टीका
Narayan Rane Slams Prakash Mahajan : नारायण राणे यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत महाजन यांच्यावर पलटवार केला आहे.
आमची वैचारिक ऊंची ठरवणारे तुम्ही कोण? असा सवाल उपस्थित करत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलेल्या टीकेवर मानी मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे. ताकद नाही तर राज ठाकरेंना प्रचारासाठी का बोलावलं होतं, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी टीका केली होती. त्यावर आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाजन तुम्ही लायकी पेक्षा अधिक बोलत आहात असं म्हणत राणेंनी प्रकाश महाजन यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी काल ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर खिल्ली उडवली होती. त्यानंतर राणे यांच्यावर प्रकाश महाजन यांनी त्यांची वैचारिक ऊंची उभं राहिल्यावर लवंग आणि बसल्यावर विलायची आहे. वैचारिक खोली त्यांना नाही अशी टीका काल केली होती.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

