Narayan Rane Oath Video | मोदी मंत्रिमंडळ विस्तार, पाहा नारायण राणेंचा शपथविधी
नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. यावेळी विस्तारित मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या चार नेत्यांना स्थान मिळाले असून यामध्ये खासदार नारायण राणे यांचादेखील समावेश आहे. राणे यांचा आज शपथविधी पार पडला. ते आता केंद्रीय मंत्री म्हणून कारभार पाहतील. राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे आणि निलेश राणे यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच नारायण राणे यानंतर देशाच्या विकासासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करतील अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

