बदलापूर अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल, ‘त्यांना एकनाथ शिंदेंचे संरक्षण अन्…’
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बदलापूर येथील एक शाळेत शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.
बदलापूर प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ‘लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली शाळा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या मतदारसंघात आहेत. आपटे आणि कोतवाल यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचे घनिष्ठ संबंध आहेत.’, असा दावा संजय राऊत यांनी केलाय तर आपटे आणि कोतवाल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संरक्षण आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सरकारवर केलेल्या टीकेवर शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली शाळा ही श्रीकांत शिंदे यांच्या नाही तर भिवंडीच्या मतदारसंघात येते.’, असे म्हटले तर “संजय राऊत खोटारडी व्यक्ती आहे. संजय राऊत राजकारणात अशिक्षित आहेत. ते नोकरी शिवसेनेची करतात आणि चाकरी शरद पवार यांची करतात” अशी टीकाही नरेश म्हस्के यांनी केली.
Published on: Sep 20, 2024 01:40 PM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
