नाशिककरांना दिलासा ! ठप्प असणारी सिटीलिंक बससेवा पुन्हा सुरू, संपामुळं किती लाखांचा फटका?
VIDEO | 3 दिवसांपासून ठप्प असलेली शहर बससेवा आजपासून पुन्हा सुरू, प्रशासनाच्या कोणत्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी घेतला संप मागे?
नाशिक, ७ ऑगस्ट २०२३ | नाशिककरांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या तीन दिवसांपासून ठप्प असलेली सिटीलिंक शहर बससेवा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. ही बससेवा नियमित सुरू झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षभरात सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी हे चौथं आंदोलन केलं होते. अनेकदा सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र वेतन थकल्याने त्यांनी हे आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. अखेर सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. याच महिन्यात कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचे प्रलंबित वेतन मिळणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरूळीत करण्यात आली आहे. तर या संपामुळे सिटीलिंकला ७५ लाखांचा फटका बसला आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
