AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik मधील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद, काय आहे कारण?

Nashik मधील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद, काय आहे कारण?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 20, 2023 | 12:19 PM
Share

VIDEO | नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद. नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह १७ बाजार समित्या बंद, काय आहे बेमुदत बंदचं कारण आणि काय आहेत मागण्या? बघा व्हिडीओ

नाशिक, २० सप्टेंबर २०२३ | नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी आजपासून पुन्हा एकदा लिलाव बंद करणार असल्याचे समोर येत आहे. विविध मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. तर दुसरीकडे नाफेड मार्फत सुरू असलेली कांद्याची खरेदी लासलगाव येथील दोन्ही केंद्रांवर बंद असल्याने कांदा उत्पादकांची कांदा विक्रीसाठी कोंडी होत आहे. दरम्यान, 2 हजार 410 रुपयांचा दर असतांना जिल्ह्यातील काही केंद्रावर 2000 रुपये दराने खरेदी केली जात असल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास रस्ता रोको आंदोलनासह रेल रोको सारखं आंदोलन करण्याचा थेट इशारा नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दिला आहे.

Published on: Sep 20, 2023 12:19 PM

Follow Us