Gopichand Padalkar यांना काळं फासा अन् एक लाख मिळवा, कोणत्या नेत्यानं केलं वक्तव्य?
VIDEO | आमदार गोपीचंद पडळकर यांना जोडे मारा, काळं फासा आणि एक लाख रुपये मिळवा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांचं राज्यातील अजीत दादा गटाच्या कार्यकर्त्यांना आवाहन
नागपूर, २० सप्टेंबर २०२३ | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना जोडे मारा, काळं फासा आणि एक लाख रुपये मिळवा, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी राज्यातील अजीत दादा गटाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. इतकेच नाहीतर गोपीचंद पडळकर नागपूरात आले तर आम्ही सोडणार नाही, पडळकर नागपूरात आले तर मार खाऊन जाणार, असा थेट इशाराच प्रशांत पवार यांनी पडळकर यांना दिलाय. उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना समजावून सांगावं, नाही तर पक्षातून काढून टाकावं, असे म्हणत रोहित पवार यांनी अजीत दादांची चिंता करु नये आम्ही अजीत पवार यांची काळजी घ्यायला सक्षम असल्याचे प्रशांत पवार यांनी म्हटले आहे. गोपीचंद पडळकर यांच्यात धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग आंदोलन करावं, असा थेट इशारादेखील त्यांनी पडळकरांना दिलाय.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

