AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand Padalkar यांनी केलेल्या टीकेवरून नितेश राणे यांचा सवाल; म्हणाले, '... यांना वेगळा न्याय का?'

Gopichand Padalkar यांनी केलेल्या टीकेवरून नितेश राणे यांचा सवाल; म्हणाले, ‘… यांना वेगळा न्याय का?’

| Updated on: Sep 20, 2023 | 11:25 AM
Share

VIDEO | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या त्या टीकेवरून नितेश राणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल, मित्र पक्षांनी दादांवर टीका करणे म्हणजे दादांचा अपमान असल्याचे म्हणत विरोधकांना काय केला थेट सवाल? बघा व्हिडीओ

मुंबई, २० सप्टेंबर २०२३ | भाजप आमदार आणि नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या त्या टीकेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना फटकारले. मात्र आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्वीट करत नितेश राणे म्हणाले, मित्र पक्षांनी दादांवर टीका करणे म्हणजे दादांचा अपमान आहे. मग महाविकास आगाडी मध्ये दादा असताना संजय राऊत ऊटसुट दादांवर टीका आणि दादांच्या विरोधात अग्रलेख लिहायचे ते कसे चालायचे? त्यांना कोणाचा आशीर्वाद होता मग? असे म्हणत नितेश राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तर संजय राजाराम राऊतला वेगळा न्याय का? संजय राऊतला मुक्त सहमती होती का ? असा सवाल देखील नितेश राणे उपस्थित केला आहे.

Published on: Sep 20, 2023 11:25 AM