Gadchiroli येथील नक्षलवाद्यांनी दिलेल्या ‘त्या’ धमकीवर धर्मराव बाबा आत्राम म्हणाले…
VIDEO | गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना गट्टा परिसरात पत्रके टाकून धमकी, नक्षलवाद्यांनी दिलेल्या 'त्या' धमकीवर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी काय दिली प्रतिक्रिया?
गडचिरोली, २० सप्टेंबर २०२३ | मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरात ही धमकी देण्यात आली. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना गट्टा परिसरात पत्रके टाकून धमकी दिली आहे. धमकीपत्रात मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांच्या काही निकटवर्तीय लोकांवर नक्षल संघटनांचा रोष दिसून येत आहे. लोहखनिज प्रकल्पांना समर्थन देणे न थांबवल्यास गंभीर परिणामांचा इशारा यात देण्यात आला आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी दिलेल्या या धमकीवर आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या क्षेत्रात रोजगार, सिंचन आणि शिक्षण यावर माझा भर आहे. आपण विकासासाठी काम करतो त्यामुळे पर्यावरण रक्षण करत आदिवासी संस्कृती जपत लोकांच्या हाताला काम देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

