AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी अपडेट! सरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, अजब जबाब दिल्याने पोलीसही चक्रावले, म्हणाला, मी नशेत...

मोठी अपडेट! सरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, अजब जबाब दिल्याने पोलीसही चक्रावले, म्हणाला, मी नशेत…

| Updated on: May 06, 2026 | 1:44 PM
Share

पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी लावून धरली जात आहे. संपूर्ण राज्यात संतापाचा कडेलोट झाला आहे. चिमूरडीसोबत जी अमानवीय घटना घडली त्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी लावून धरली जात आहे. संपूर्ण राज्यात संतापाचा कडेलोट झाला आहे. चिमूरडीसोबत जी अमानवीय घटना घडली त्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी, नराधम भीमराव कांबळेला कठोर शिक्षा व्हावी, अशी स्थानिकांकडून तसेच अनेक नेत्यांकडून मागणी केली जात आहे. पोलीस प्रशासनही या प्रकरणाने खडबडून जागे झाले असून या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. पोलिसांनी गुन्हा करण्यामागचा आरोपीचा हेतू जाणून घेण्यासाठी आरोपीची उलटतपासणी सुरू केली आहे. या उलट तपासणीत आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांना अजब आणि धक्कादायक अशी उत्तरे दिली आहेत.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने जे उत्तर दिलं, त्याने पोलीसही थंड पडले. “अत्याचार झाला त्या दिवशी मी नशेत होतो,” असं थंड डोक्याने आरोपीने उत्तर दिलं आहे. आरोपीने नशेचा आधार घेत स्वत:चा बचाव करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाला तो बचावासाठी असे बोलत असल्याचा संशय आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी त्याची कसून चौकशी करत आहेत. आरोपीने नसरापूर गावात एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. इतकेच नाही, तर चिमुरडीने टाहो फोडू नये म्हणून आरोपीने तिच्या तोंडात मोजा कोंबला होता, त्यानंतर त्याने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारले, इतकेच नाही, तर खुनाला वाचा फुटू नये म्हणून त्याने चिमूरडीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Published on: May 06, 2026 01:44 PM
Follow Us