AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Fadnavis :  नवं भारताचं प्रतीक अन् स्वप्नपूर्तीचा दिवस... विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

CM Fadnavis : नवं भारताचं प्रतीक अन् स्वप्नपूर्तीचा दिवस… विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Oct 08, 2025 | 5:29 PM
Share

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे स्वप्नपूर्तीचा दिवस आणि नव्या भारताचे प्रतीक, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वप्नपूर्तीचा दिवस आणि नव भारताचे प्रतीक असे संबोधले आहे. 90 च्या दशकापासून प्रस्तावित असलेल्या या विमानतळाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर, त्यांनी प्रगती आढावा बैठकीत या प्रकल्पाला गती दिली. विमानतळाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या आठपैकी सात एनओसी एकाच दिवसात मिळाल्या, तर आठवी एनओसी पंधरा दिवसांत प्राप्त झाली. यामुळे दहा वर्षांपासून थांबलेले काम सुरू झाले, असे फडणवीस म्हणाले.

तर हा विमानतळ केवळ एक अभियांत्रिकी चमत्कार नाही तर महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये 1% नी वाढ होण्याची क्षमता आहे. याशिवाय, अटल सेतू आणि प्रस्तावित वॉटर टॅक्सीमुळे थेट गेटवे ऑफ इंडियाला जोडणी मिळणार असून, वाहतूक कोंडी टाळून प्रवासाची सोय होईल. हे विमानतळ महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Published on: Oct 08, 2025 05:29 PM