Navi Mumbai च्या खारघरमधील बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 23, 2021 | 10:11 AM

खारघरमधील सेक्टर 15 येथील खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर पनवेल महानगरपालिका आणि पोलिस दलाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. सदर डॉक्टरकडे वैद्यकिय व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचे सिध्द झाल्याने खारघर पोलिस स्थानकांमध्ये या डॉक्टरवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघरमधील सेक्टर 15 येथील खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर पनवेल महानगरपालिका आणि पोलिस दलाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. सदर डॉक्टरकडे वैद्यकिय व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचे सिध्द झाल्याने खारघर पोलिस स्थानकांमध्ये या डॉक्टरवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात निवासी वैद्यकिय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या बोगस डॉक्टरवरती आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या परवानगीने मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील डॉ. भक्तराज भोईटे, डॉ.सुरेश पंडित, विजय महाले, स्टाफ नर्स संगीता पाटील, विकास तीरगुळ यांच्या मदतीने सापळा रचून बोगस डॉक्टरला पकडण्यात आले. खारघर पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्त स्टींग ऑपरेशन करून बोगस डॉक्टरवरती कारवाई करण्यात आली. | Navi Mumbai Fraud Doctor Arrested From Khargar

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI